थेट मजकुराकडे जा

नेहमीचे प्रश्न

शेवटचा बदल: 10 नोव्हेंबर 2026

नोंदणीसाठी पैसे लागतात का?

नाही. नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. शिवाय मोबाईल, ईमेल आणि सरकारी ओळखपत्र पडताळणाऱ्यांना 90 दिवसांचे प्रीमियम सदस्यत्व आपोआप मोफत मिळते — प्रत्येक व्यक्तीला एकदाच.

कोण नोंदणी करू शकते?

कायद्याने लग्नास पात्र असलेली 18 वर्षांवरील वधू आणि 21 वर्षांवरील वर. आई-वडील, भाऊ-बहीण किंवा नातेवाईक दुसऱ्यासाठी प्रोफाइल बनवू शकतात, पण त्या व्यक्तीच्या संमतीने. एका व्यक्तीचे एकच प्रोफाइल असू शकते.

ओळखपत्र पडताळणी का आवश्यक आहे?

तुम्हाला दिसणारे प्रत्येक स्थळ खऱ्या आणि विवाहयोग्य वयाच्या व्यक्तीचे असावे म्हणून. बनावट प्रोफाइल रोखण्याचा हाच सर्वात खात्रीचा मार्ग आहे. ओळख भारत सरकारच्या DigiLocker सेवेमार्फत आधार, पॅन किंवा ड्रायव्हिंग लायसन्सने पटवली जाते.

तुम्ही माझा आधार क्रमांक किंवा ओळखपत्राची प्रत ठेवता का?

नाही. DigiLocker फक्त तुमचे नाव, जन्मतारीख आणि लिंग यांची खात्री करून देते. ओळखपत्राचा पूर्ण क्रमांक किंवा त्याची प्रत आम्ही कधीही ठेवत नाही.

संकेतस्थळावर माझे नाव किंवा जन्मतारीख चुकीची दिसते. काय करू?

नाव, लिंग आणि जन्मतारीख तुमच्या सरकारी ओळखपत्रावरून घेतली जाते, त्यामुळे ती ओळखपत्राशी तंतोतंत जुळते. ओळखपत्रातच चूक असेल तर info@mangalyavivah.com वर लिहा; आम्ही मदत करू.

पसंती कशी पाठवायची?

एखादे स्थळ आवडले की "पसंती पाठवा" दाबा. समोरच्यांनी ती स्वीकारली की तुमचे जुळते — मग चॅट करता येते आणि प्रोफाइल अधिक पाहता येते. पाठवलेली पसंती मागे घेता येते आणि आलेली नाकारता येते.

चॅट कधी करता येते?

दोघांपैकी एकाने दुसऱ्याची पसंती स्वीकारली की लगेच. चॅट संकेतस्थळावरच राहते, आणि दोघांपैकी कोणीही कधीही दुसऱ्याला ब्लॉक करू शकतो किंवा तक्रार करू शकतो.

माझा मोबाईल नंबर कोणाला दिसतो?

फक्त सक्रिय सदस्यत्व असलेल्या, ओळख पडताळलेल्या सदस्यांना. सहज भेट देणाऱ्यांना किंवा ओळख न पटवलेल्या सदस्यांना तो कधीच दिसत नाही.

माझे फोटो कोणाला दिसतात?

सुरुवातीला सर्व ओळख पडताळलेल्या सदस्यांना. प्रोफाइलमधील "माझे फोटो" या भागात तुम्ही ते फक्त ज्यांची पसंती स्वीकारली त्यांनाच दाखवायचे, असे ठरवू शकता.

पैसे कसे भरायचे? ते सुरक्षित आहे का?

सदस्यत्व पानावर योजना निवडा आणि Zoho Payments मार्फत UPI, कार्ड किंवा नेट बँकिंगने पैसे भरा. तुमच्या कार्डचे किंवा बँकेचे तपशील आम्ही कधीही पाहत किंवा ठेवत नाही. योजनेचे आपोआप नूतनीकरण होत नाही.

पैसे परत मिळतात का?

योजना सुरू झाल्यावर शुल्क परत मिळत नाही. पैसे कापले गेले पण योजना सुरू झाली नाही, किंवा दोनदा पैसे कापले गेले, तर 7 दिवसांच्या आत आम्हाला लिहा; आम्ही ते दुरुस्त करू. सविस्तर माहिती परतावा धोरणात आहे.

प्रोफाइल लपवायचे किंवा हटवायचे कसे?

प्रोफाइल → सेटिंग्ज मध्ये जा. "प्रोफाइल लपवा" निवडल्यास तुम्ही पुन्हा दाखवेपर्यंत ते कोणालाही दिसत नाही. "प्रोफाइल हटवा" निवडल्यास ते लगेच दिसेनासे होते आणि तुमची माहिती 30 दिवसांत पुसली जाते.

कोणी माझ्याकडे पैसे मागितले. काय करू?

एकही पैसा पाठवू नका आणि त्या सदस्याची तक्रार करा: त्यांचे प्रोफाइल किंवा चॅट उघडून "तक्रार करा" निवडा. मांगल्य विवाह तुमचा पासवर्ड, OTP किंवा पैसे कधीही मागत नाही.

मी पासवर्ड विसरलो/विसरले.

लॉग इन पानावर "पासवर्ड विसरलात?" निवडा आणि तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर टाका. नवीन पासवर्ड ठेवण्यासाठी आम्ही ईमेलवर लिंक पाठवू.

मांगल्य विवाह आमच्यासाठी कुटुंबाची चौकशी करते का?

आम्ही प्रत्येक सदस्याचा मोबाईल नंबर, ईमेल आणि सरकारी ओळखपत्र पडताळतो. कुटुंब, शिक्षण, नोकरी आणि उत्पन्न ही माहिती सदस्य स्वतः लिहितात, त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबासह स्वतः चौकशी करा. लग्नाचा निर्णय नेहमीच तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा असतो.

तुमच्याशी संपर्क कसा करायचा?

info@mangalyavivah.com वर लिहा किंवा +91 86002 74813 वर फोन करा (सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 7). प्रत्येक संदेशाला आम्ही 24 तासांच्या आत उत्तर देतो.